बृजभूषण यांचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध, महाराष्ट्रातूनही सिंह यांना पाठिंबा

| Updated on: May 09, 2022 | 6:48 PM

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदाराला पाठिंबा वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातूनही बृजभूषण सिंह यांना पाठिंबा मिळत आहे. आमदार अबू आझमी यांनीही सिंह यांना फोन करून पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. 5 जून रोजी ते अयोध्येला (ayodhya) पोहोचणार आहेत. प्रभू श्रीराम सर्वांचेच आहेत. त्यामुळे त्यांच्या दर्शनाला कोणीही जाऊ शकतो, असं सांगत महाराष्ट्र भाजपने राज ठाकरे यांच्या दौऱ्याचं स्वागत केलं. पण भाजपच्या उत्तर प्रदेशातील खासदाराने राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. बृजभूषण सिंह (brijbhushan singh) असं या भाजपच्या खासदाराचं नाव आहे. राज ठाकरे मिलिट्री घेऊन आले तरी त्यांना आम्ही अयोध्येत येऊ देणार नाही. आमच्या मृतदेहावरून राज यांना जावं लागेल, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. सिंह यांच्या या भूमिकेचं समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी स्वागत केलं आहे. एवढंच नव्हे तर आझमी यांनी थेट सिंह यांना फोन करून त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध होत असताना महाराष्ट्रातूनही या विरोधाला बळ मिळत असल्याचं चित्रं निर्माण झालं आहे.

Published on: May 09, 2022 06:48 PM
एस.टी कष्टकरी जनसंघ या Gunratna Sadavarte यांच्या नव्या संघटनेची घोषणा
Kolhapur Panchganga Protest | कोल्हापूरकरांचं अनोखं आंदोलन, सिलिंडर पंचगंगेत टाकून आंदोलन