कांदिवलीतील शाळेत अजान लावलं; सपा नेता म्हणतो, “…हा भाजपचा अजेंडा”
मुंबईतील कांदिवली परिसरातील कपोल विद्यानिधी शाळेमध्ये आज सकाळी प्रार्थनेनंतर अजान लावण्यात आली. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने शाळेविरोधात कांदिवली पोलिसांत तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.या घटनेवर समाजवादी पक्षाचे नेते अबु आजमी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मुंबई : मुंबईतील कांदिवली परिसरातील कपोल विद्यानिधी शाळेमध्ये आज सकाळी प्रार्थनेनंतर अजान लावण्यात आली. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने शाळेविरोधात कांदिवली पोलिसांत तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.या घटनेवर समाजवादी पक्षाचे नेते अबु आजमी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दोन गटात वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप आजमी यांनी केला आहे. तसेच शाळेत मुस्लिम कर्मचारी नसल्यास अजान वाजवायला नको अशी भुमिकाही त्यांनी घेतली आहे.
Published on: Jun 16, 2023 04:53 PM