कांदिवलीतील शाळेत नमाज पठण; सपा नेता म्हणतो, “ती शाळा हिंदूंची, शुक्रवार होता म्हणून…”
काही दिवसांपूर्वी कांदिवलीच्या कपोल विद्यानीधी या शाळेत प्रार्थनेनंतर लाऊडस्पीकरवर अजान लावल्याची घटना घडली. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काही पालकांनी यावर आक्षेप घेतला.
मुंबई: काही दिवसांपूर्वी कांदिवलीच्या कपोल विद्यानीधी या शाळेत प्रार्थनेनंतर लाऊडस्पीकरवर अजान लावल्याची घटना घडली. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काही पालकांनी यावर आक्षेप घेतला. तसंच, शिवसेनेने शाळेविरोधात कांदिवली पोलिसांत तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली संपुर्ण परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. अजान लावणाऱ्या शिक्षिकेला निलंबित केल्यानंतर शाळेविरोधातील आंदोलन मागे घेण्यात आले. या संपूर्ण वादावर सपा नेते अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कांदीवलीची शाळा ही हिंदूची शाळा आहे.जेव्हा हिंदुंचा सण असतो तेव्हा त्यांची प्रार्थना होते. शुक्रवार होता म्हणून नमाज लावण्यात आली”, असं अबू आझमी म्हणाले.
Published on: Jun 18, 2023 10:47 AM