शैक्षणिक साहित्य खरेदीत सरकारचा भ्रष्टाचार; विरोधी पक्ष नेत्याचा आरोप
पालकांसह आता राज्य सरकार देखील कामाला लागलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून शालेय साहित्य थेट खरेदी केलं जाणार असून ते विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष 2023 आता काही दिवसातच सुरू होणार आहे. त्यामुळे पालकांसह आता राज्य सरकार देखील कामाला लागलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून शालेय साहित्य थेट खरेदी केलं जाणार असून ते विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यावरून राज्य सरकारमधील संबंधीत मंत्रीकडून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकार निशाना साधत सरकारच हा भ्रष्टाचार करत असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी शैक्षणिक साहित्याची खरेदी ही 400 रूपये ऐवजी 1100 रूपये, सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन 10 हजारचे 22 हजारला तर दुसर 4500 चं मशीन 11 हजारला खरेदी करण्यात आल्याचं ते म्हणालेत. तर मनमानी प्रमाणे संबंधीत मंत्री हे आपल्या विभागात खरेदी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Published on: Jun 12, 2023 01:44 PM