चांदणी चौकातील पुलामुळं नागरिकांना आनंद मिळेल, चंद्रकांत पाटील यांचं मत
निवडणुका संपल्यानंतर कुणालातरी बहुमत मिळते. निवडून आलेल्या सगळ्यांनी आणि पडलेल्यांनीही हातात हात घालून विकासाची कामं करायची असतात, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पायाभूत सुविधांमध्ये रस्ते येतात. उड्डाणपूल येतो. मेट्रो येते. स्वच्छ पिण्याचं पाणी मिळणं, मुबलक पाणी मिळणं, या साऱ्या बाबी येतात. पुणे हे खूप शांत शहर आहे, असं बहुतेकांना वाटतं. त्यामुळं त्यांनी पुण्यात बंगला घेऊन ठेवलाय.गेल्या पाच वर्षात महापालिकेनं यासाठी प्रयत्न केलाय, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मेट्रो पूर्ण व्हायची आहे. चोवीस तास पाणी उपलब्ध करून द्यायचा आहे. पक्ष हे निवडणुकीपर्यंत असतात. निवडणुका संपल्यानंतर कुणालातरी बहुमत मिळते. निवडून आलेल्या सगळ्यांनी आणि पडलेल्यांनीही हातात हात घालून विकासाची कामं करायची असतात, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
Published on: Sep 16, 2022 08:59 PM