मंत्री छगन भुजबळ धमकी प्रकरणात मोठी माहिती उघड; पोलीस अधिकारी म्हणतात…

| Updated on: Jul 11, 2023 | 2:38 PM

याप्रकरणी पोलीसांनी जलद पावलं उचलंत कारवाई करण्यात आली. या कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरूणाला महाड येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर त्याचे नाव प्रशांत पाटील असे आहे

पुणे : राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर याप्रकरणी पोलीसांनी जलद पावलं उचलंत कारवाई करण्यात आली. या कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरूणाला महाड येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर त्याचे नाव प्रशांत पाटील असे असून त्याने ही धमकीस दारुच्या नशेत दिल्याचे पोलिसांनी म्हटलं होतं. पण आता नव्या माहितीनुसार प्रशांत पाटील याच्याबाबत नवी अपडेट समोर आली आहे. पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत पाटील याने हि धमकी दारूच्या नशेत दिली असून त्याची कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नाही. तर त्याची अजूनही चौकशी सुरू आहे. याचबरोबर प्रशांत पाटील याची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचेही म्हटलं आहे.

Published on: Jul 11, 2023 02:38 PM
“सैतान हा गावगाड्यातील शब्द, माझ्याकडून अनावधानाने…” शरद पवार यांच्यावरील टीकेवर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण
रावेरच्या अंगणात सासरे विरुद्ध सून, लोकसभेसाठी एकनाथ खडसे, रक्षा खडसे यांच्या विरोधात प्रचार करणार?