पोलीसांनी दालनाला सिल ठोकलं तेच काढत ठाकरे गटाच्या ताब्यात दिलं; शिंदे गटाला मोठा धक्का

| Updated on: Jul 13, 2023 | 8:37 AM

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवेसेना सुरूंग लावत शिवसेना फोडली आणि आपला गट घेत फडणवीस यांच्याबरोबर सत्ता स्थापन केली त्यांनतर जिल्हा पातळीवर देखील शिवसेनेत फूट पडली यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या अनेक शाखांवर आणि पक्षाच्या कार्यालयावंर तसेच स्वराज्य संस्थांमधील दालनावर ताबा घेण्यात आला.

नाशिक : गेल्या वर्षभारत सुरू असलेल्या शिंदे आणि ठाकरे गटातील वाद हा काही कमी होताना दिसत नाही. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवेसेना सुरूंग लावत शिवसेना फोडली आणि आपला गट घेत फडणवीस यांच्याबरोबर सत्ता स्थापन केली त्यांनतर जिल्हा पातळीवर देखील शिवसेनेत फूट पडली यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या अनेक शाखांवर आणि पक्षाच्या कार्यालयावंर तसेच स्वराज्य संस्थांमधील दालनावर ताबा घेण्यात आला. असाच प्रयत्न नाशिक महानगरपालिकेत झाला. येथील म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या दालनाचा ताबा घेण्यावर शिंदे गट आणि ठाकरे गट हे आमनेसामने आले होते. त्यावरून ते पोलिसांनी सिल केलं होतं. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने याचा ताबा ठाकरे गटाकडे गेला आहे. आज अखेर पोलिसांनी पंचांच्या समक्ष या दालनाचे सिल काढून कार्यालयाचा ताबा ठाकरे गटाकडे दिला. ठाकरे गटाचे महानगरप्रमुख तथा म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्याकडे पोलिसांनी दालनाचा ताबा दिला.

Published on: Jul 13, 2023 08:37 AM
“आमदारांच्या बायकाही विचारतात…काहो फोन येणार का तुम्हाले?”; बच्चू कडू यांचा मिश्किल टोला
अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यामागचं नेमकं कारण काय? पाहा काय म्हणाले प्रफुल्ल पटेल…