Rana दाम्पत्याने अभिवादन केलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचे भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते शुद्धीकरण करणार
यावेळी नागपुरात येताच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘जय हनुमान, जय संविधान, जय श्रीरामच्या’ घोषणांनी यावेळी त्यांनी नागपूर दणाणून सोडलं. दरम्यान, इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे गुलाब जलनं शुद्धीकरण करणार असल्याची माहिती आहे.
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) दाम्पत्याने काल अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. याच ठिकाणी भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते सकाळी 11 वाजता शुद्धीकरण करणार आहे. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे गुलाब जलनं शुद्धीकरण करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याने संविधान म्हणून दाखवावे, अशी मागणी भीम ब्रिगेडने केली होती. काल बऱ्याच दिवसांनी राणा दाम्पत्य दिल्लीतून नागपुरात दाखल झाले. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) आणि त्यानंतर झालेली जेल, हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. जेलमधून सुटल्यानंतर नवनीत राणा यांनी दिल्ली गाठत राज्य सरकार आणि पोलिसांची संसदीय समिती आणि लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली. त्यानंतर हेच राणा दाम्पत्य संजय राऊत यांच्यासोबत लडाख दौऱ्यादरम्यान दिसून आले. त्यानंतर ते काल नागपुरात आले. यावेळी नागपुरात येताच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘जय हनुमान, जय संविधान, जय श्रीरामच्या’ घोषणांनी यावेळी त्यांनी नागपूर दणाणून सोडलं. दरम्यान, इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे गुलाब जलनं शुद्धीकरण करणार असल्याची माहिती आहे.