Kiran Mane : ‘कुणी पाठीशी उभं नाही राहिलं तरी मी एकटा लढेन’
सत्ताधाऱ्यांना जाब विचारणं हे सजग नागरिकाचं कर्तव्य आहे तसंच एखाद्या नेत्याबद्दल पोस्ट (Post) केली म्हणजे त्या पक्षाचा झालो असं नाही, असं मत अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी व्यक्त केलं आहे.
सत्ताधाऱ्यांना जाब विचारणं हे सजग नागरिकाचं कर्तव्य आहे तसंच एखाद्या नेत्याबद्दल पोस्ट (Post) केली म्हणजे त्या पक्षाचा झालो असं नाही, असं मत अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी व्यक्त केलं आहे. मुलगी झाली हो मालिकेतून त्यांना वगळल्यानंतर ही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राजकारणावर बोलू नका, लिहू नका असं म्हणणं अयोग्य आहे. याप्रकरणी कुणी पाठीशी उभं नाही राहिलं तरी मी एकटा लढेन, असंही त्यांनी म्हटलं आहे.