सलमान खानला पुन्हा एकदा जीवे ठार मारण्याची धमकी
धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानला वाय प्लस सुरक्षा पुरवली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलले होते
मुंबई : अभिनेता सलमान खानला ई-मेलवर जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. याआधी शनिवारी मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या कार्यालयात धमक्या पाठवल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग या गुंडांवर गुन्हा दाखल केला होता. तर धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानला वाय प्लस सुरक्षा पुरवली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलले होते.
तर सलमान खानने हरिण प्रकरणात बिश्नोई समाजाची माफी मागावी असं लॉरेन्स बिश्नोई यांनी सांगितलं होतं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाल हत्याकांड प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई हा पंजाब तुरुंगात तुरुंगवास भोगत आहे. तर त्याचे हे कृत्य पोलिसांची डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे सर्व तपास मुंबई आणि बांद्रा पोलीस करीत आहेत.