अभिनेत्री उर्मिला मातोंडकर देणार राहुल गांधी यांना साथ, पहा काय म्हणाली?
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नुकतीच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला होता. त्यानंतर आता शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर याही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.
जम्मू काश्मीर : काँग्रेस नेते राहुल गांधी ( rahul gandhi ) यांची भारत जोडो यात्रा ( bharat jodo ) जम्मू काश्मीरमध्ये येऊन पोहोचली आहे. या यात्रेरम्यान अनेक नेत्यांनी हजेरी लावून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आपला सहभाग नोंदवला आहे. यात आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकरसुद्धा सहभागी होणार आहे.
उर्मिला मातोंडकर हिने उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसची लोकसभा निवडणुकीत लढविली होती. पण, तिचा पराभव झाला. त्यांनतर तिने शिवसेनेत प्रवेश केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविली होती. त्यामध्ये उर्मिला मातोंडकर हिचे नाव होते. मात्र, ही यादी राज्यपालांनी मजूर केली नाही त्यामुळे या अभिनेत्रीची आमदारकीची संधी हुकली.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नुकतीच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला होता. त्यानंतर आता शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर याही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. ही माहिती तिने ट्विट करून दिली आहे.