अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला ‘या’ कारणासाठी आली नोटीस
ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासह आणखी १२०० मालमत्ता धारकांना या तहसीलदारांनी नोटीस पाठविली आहे.
नाशिक : बिग बी अमिताभ बच्चन ( Amotabh Bachchan ) यांची सून आणि प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ( Aishwarya Rai Bachchan ) यांना नोटीस पाठविण्यात आलीय. २२ हजारांचा कर थकविल्याप्रकरणी ही नोटीस पाठविण्यात आली आहे.
सिन्नर ( Sinnar ) येथील ठनगाव येथे ऐश्वर्या राय बच्चन हिची जमीन आहे. या जमिनीचा २२ हजार रुपये इतका मालमत्ता कर थकविल्यामुळे ही नोटीस पाठविण्यात आली आहे. ठनगावचे तहसीलदार यांनी ही नोटीस पाठविली आहे.
ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासह आणखी १२०० मालमत्ता धारकांना या तहसीलदारांनी नोटीस पाठविली आहे.
Published on: Jan 17, 2023 09:11 AM