‘मनसेची जागर यात्रा म्हणजे श्रेय घेण्याचा प्रकार’; दीपाली सय्यद यांचा संदीप देशपांडे यांच्यासह मनसेला टोला
खराब रस्त्यावरून शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांमध्ये आता शाब्दीक फटकेबाजी पहायला मिळत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे आणि शिंदे गटाच्या दीपाली सय्यद यांच्यात जोरदार वाद पाहायला मिळत आहे.
मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक आणि कोकणातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर मनसेकडून विविध ठिकाणी खळखट्याक कार्यक्रम करण्यात आला. तर मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘जागर यात्रा’ काढली जाणार आहे. यावरूनच अभिनेत्री व शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टीका केली होती. तर मनचेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके व गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहिम घ्यावी. राज्यभरात जेवढे मनचेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे! युवा नेत्यांना घराबाहेर काढुन कामाला लावा! अशी टीका केली होती. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दीपाली सय्यद यांची खिल्ली उडवत त्यांचा एकेरी उल्लेख केला होता. तर कोण दीपाली सय्यद? कोण विचारतंय तिला? त्या नेमक्या कुठल्या पक्षाच्या आहेत? ते आधी सांगा असा टोला लगावला होता. त्यानंतर आता दीपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा मनसेला छेडलं आहे. यावेळी त्यांनी संदीप देशपांडे यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे. पाहा काय म्हटलं आहे दीपाली सय्यद यांनी…