शिंदे गट बाळासाहेबांचा फोटो वापरू शकतात

| Updated on: Jul 26, 2022 | 8:24 PM

एकादी व्यक्ती जर सामाजिक कार्यामुळे सार्वत्रिक होत असेल, तिचं काम लोकांना आवडत असेल, तिचे समर्थन करण्यात येत असेल तर त्या व्यक्तीचा फोटो कुणीही वापरु शकते, त्यामुळे एकनाथ शिंदे गट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरु शकतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्याबरोबर जास्त आमदार असल्याने ही खरी शिवसेना असा दावा केला आहे, त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणावरही दावा सांगितला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करत तुमच्यात हिम्मत असेल तर माझ्या वडिलांचा का फोटो वापरता असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी त्याविषयी सांगितले की, एकादी व्यक्ती जर सामाजिक कार्यामुळे सार्वत्रिक होत असेल, तिचं काम लोकांना आवडत असेल, तिचे समर्थन करण्यात येत असेल तर त्या व्यक्तीचा फोटो कुणीही वापरु शकते, त्यामुळे एकनाथ शिंदे गट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरु शकतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Published on: Jul 26, 2022 08:24 PM
‘उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळायला राऊतांनी मुलाखत घेतली’
संजय राऊत नीच माणूस;बनावट पत्रकार