लाडकी बहिण योजना, रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर 2 हप्ते जमा झाल्याने पोस्टात तोबा गर्दी

| Updated on: Aug 17, 2024 | 2:03 PM

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेवरुन राज्यात राजकारण सुरु आहे. या योजनेत नुकतेच 35 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे.त्यामुळे महिलांना रक्षाबंधानाची अनोखी भेट मिळाली आहे. अनेक पोस्टात आणि बॅंकात महिलांची तोबा गर्दी झालेली आहे.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यावर दोन हप्ते असे एकूण 3000 रुपये जमा झाल्याने राज्यातील बॅंक आणि पोस्ट बॅंकेत गर्दी झालेली आहे. अमरावती पोस्ट बॅंकेत पैसे काढण्यासाठी तसेच केवायसी पूर्ण करण्यासाठी महिला रांगणे उभ्या आहेत. ही योजना चांगली असून ती सरकारने कायम सुरु ठेवावी अशी मागणी राज्यातील महिलांनी केलेली आहे. महाराष्ट्रात मध्य प्रदेशाच्या लाडली बहेनाच्या धर्तीवर ( Mukhyamantri Ladki Bahin Yojana) ही योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे, या योजनेत महाराष्ट्रातील काही निराधार महिला आणि तरुणींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करण्यासाठी लाडकी बहीण योजना सरकारने आणली आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात राज्य सरकार जमा करणार आहे. त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे. या योजनेत 35 लाख महीलांच्या खात्यावर दोन हप्ते जमा करण्यात आले आहेत.

Published on: Aug 17, 2024 01:33 PM
शरद पवारांचा मुका घ्यायचं बंद करा, भाजप नेत्यानं जरांगे पाटलांना फटकारलं
डी-मार्टला वस्तू स्वस्त देणे का परवडतं, अफलातून बिझनेस मॉडेलची भन्नाट कहाणी