शिरुरची निवडणूक रेकॉर्डब्रेक मतांनी जिंकणार, आढळराव पाटील यांचा आत्मविश्वास

| Updated on: Mar 23, 2024 | 9:19 PM

शिरुरची लोकसभा निवडणूक यंदा लक्षवेधी ठरणार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे येत्या 26 मार्च रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याशी आढळराव पाटील यांची लढत रंगतदार होणार असल्याचे म्हटले जात आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. अखेर आढळराव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. आढळराव पाटील येत्या 26 मार्च रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या आढळराव यांची होणारी लढत लक्षवेधी ठरणार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे की पहिली निवडणूक काही नसताना 30 हजार मतांनी जिंकलो होतो. दुसरी निवडणूक 1 लाख 80 हजाराने जिंकलो. तिसरी निवडणूक 3 लाख 3 हजाराने जिंकलो. आता चौथी निवडणूक सगळ्या निवडणूकांचे रेकॉर्ड तुटतील अशी होणार असल्याचा आत्मविश्वास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Mar 23, 2024 09:18 PM
शिवसेनेची धुरा राज ठाकरे यांच्याकडे जाणार?, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
Video : उद्धव ठाकरे यांच्यासोबत वंचितची युती राहीली नाही, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य