इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर आदिती तटकरे घटनास्थळी दाखल; दिली महत्वाची माहिती!
इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर संसदेचे अधिवेशन सोडून आमदार आदिती तटकरे यांनी दुर्घटनाग्रस्त भागाचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी जखमी रुग्णांची रुग्णालयात जावून भेट घेतली.
खालापूर, 20 जुलै 2023 | रायगडमधील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात 50 ते 60 घरे दबली आहेत. या दरडीखाली 100 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर संसदेचे अधिवेशन सोडून आदिती तटकरे रायगडच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. आदिती तटकरे यांनी जखमी गावकऱ्यांची रुग्णालयात जावून भेट घेतली आहे. तसेच इर्शाळी वाडी गावच्या आजूबाजूच्या दरडग्रस्त गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती दिली आहे. इर्शाळवाडीच्या मदतीसाठी प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. प्रशासनाने दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना 8108195554 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केलं आहे.
Published on: Jul 20, 2023 11:41 AM