आदित्यने डिवचले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांची एरियल फोटोग्राफी, तर मी…’
मंत्रालयात एक शेतकरी बसला आहे. ज्यांच्या शेतात दोन हेलिपॅड आहेत. बाकीच्या कुणाच्याही शेतात असे दोन हेलिपॅड नाहीत, असा टोला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केलाय.
मुंबई : मंत्रालयात एक शेतकरी बसला आहे. ज्यांच्या शेतात दोन हेलिपॅड आहेत. बाकीच्या कुणाच्याही शेतात असे दोन हेलिपॅड नाहीत, असा टोला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केलाय. मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर वापरतो. ज्या ठिकाणी पोहोचायला आठ तास लागतात तिथे एका तासात पोहोचतो. वेळ वाचतो. त्यावेळेत हजारो फायलीवर सह्या होतात. हेलिकॉप्टरमधून गेल्यावर मी मुख्यमंत्री असतो. पण, गावात शेतात गेल्यावर मी शेतकरी असतो. केवळ एरियल फोटोग्राफी करण्यासाठी मी हेलिकॉप्टर वापरत नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
Published on: May 22, 2023 09:45 PM