‘आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?’, शिंदे गटाच्या नेत्याने केली झोंबणारी टीका
छत्रपती संभाजी उद्यानातील बछड्यांची नावे ठेवताना 'आदित्य' या नावाची चिट्ठी आली. मात्र, ते नाव बाजूला सारून दुसरी चिट्ठी काढण्यात आली. त्यावरून ठाकरे गटाने सरकारवर टीका केली. तर, शिंदे गटाच्या नेत्याने या नावावरून जहरी टीका केलीय.
मुंबई : 22 सप्टेंबर 2023 | राज्यात ज्यावेळी कोविड आला. त्याचवेळी उद्धव ठाकरे सरकार गेले. कोविड काळात लोकांना मदतीची गरज होती. पण, त्या काळात कोविड सेंटर, औषध घोटाळा झाला. त्यातून पैसे काढण्यात आले. डेडबाँडीच्या बँगमधून पैसे काढले. परंतु, गणपतीच्या कृपेनं उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे नावाचे विघ्न महाराष्ट्रातून दूर झालं, अशी टीका शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते किरण पावसकर यांनी केली. कुठे तरी वाघाच्या बछड्यांचे नाव आदित्य निघाले. पण, त्यावरून म्हणतात की धसका घेतला का? जे विघ्न गजाननाने दूर केले त्याचे नाव प्राण्यालाही देऊ नका. आदित्य हे नाव इतके वाईट झाले मग प्राण्याला ते नाव कसे देणार? दिशा सालियान आणि सुशांत सिंह यांच्या केसमध्ये आदित्य नाव इतके बदनाम झालं की बिचाऱ्या त्या प्राण्यालाही कुणी काही बोलू नये असे वाटतं असा टोला त्यांनी लगावला.
Published on: Sep 22, 2023 10:55 PM