उद्याची सुनावणी संपूर्ण देशासाठी महत्त्वाची
उद्या न्यायालयात निकाल आहे, तो निकाल शिवसेनेसाठी महत्वाचा आहेच मात्र त्याबरोबरच देशाच्या लोकशाहीसाठीही महत्वाचा असल्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांसमोर बोलताना भविष्यातील आपला राजकीय दौरा कसा असणार हे सांगत त्यांनी शिंदे गटावर कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी बंडखोर गट आणि त्यातच आज बारा खासदारांचा एक गट भाजपला जाऊन मिळाल्यानंतर त्यांनी सांगितले की, शिवसेना ही जनसामान्यांच्या जीवावर शिवसेना मोठी झाली आहे, त्यामुळे उद्या न्यायालयात निकाल आहे, तो निकाल शिवसेनेसाठी महत्वाचा आहेच मात्र त्याबरोबरच देशाच्या लोकशाहीसाठीही महत्वाचा असल्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
Published on: Jul 19, 2022 09:02 PM