“महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे”; मुंबईत युवासेनेच्या वतीने जोरदार बॅनरबाजी

| Updated on: Jun 13, 2023 | 2:33 PM

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित युवा सेनेच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. चेंबूरमध्ये युवा सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले होते. शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या हस्ते हे वाटप पार पडले.

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित युवा सेनेच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. चेंबूरमध्ये युवा सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले होते. शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या हस्ते हे वाटप पार पडले. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकलेले पाहायला मिळत आहेत. युवासेनेचे मुंबई समन्वयक कार्तिक स्वामी यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेला बॅनर टिळकनगर परिसरात लावला आहे.तसेच चेंबूरमध्येही युवा सेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. या बाबत सूरज चव्हाण आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर म्हणजे जनतेच्या मनातल्या भावना असल्याचे सांगितले आहे.

Published on: Jun 13, 2023 02:33 PM
‘शिवसेनेचे ४० आमदार एकत्र आल्यानं भाजप पुन्हा सत्तेत’, ‘या’ नेत्याच्या वक्तव्यानं चर्चा
जाहिरातीवरून घमासान! भाजप नेत्याकडून सुचक प्रतिक्रिया; म्हणाला, ‘कुणाचं महत्व…’