“सरकार पडेल पण…”, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आदित्य ठाकरे यांचं सूचक विधान

| Updated on: Jun 29, 2023 | 7:38 AM

राज्यातील सत्तांतराला एक वर्ष पूर्ण झालं. तरीदेखील शिंदे-फडणवीस सरकारचा कॅबिनेट विस्तार झालेला नाही. सरकारमध्ये सध्या केवळ 20 मंत्री असून अनेकांवर अतिरिक्त विभागांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.  शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई:  राज्यातील सत्तांतराला एक वर्ष पूर्ण झालं. तरीदेखील शिंदे-फडणवीस सरकारचा कॅबिनेट विस्तार झालेला नाही. सरकारमध्ये सध्या केवळ 20 मंत्री असून अनेकांवर अतिरिक्त विभागांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.  शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “आता सरकार पडेल, पण मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. यांना सतत दिल्लीत जावं लागतं. मात्र विस्तार काही होणार नाही. हे लिहून घ्या. 40 लोकांमधून जे मंत्रिमंडळाबाबत आशा लावून बसले आहेत, त्यांना काहीही मिळणार नाही. मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, करण विस्तार करण्याची ताकद आणि धमक यांच्यात नाही. 1 जुलैला मुंबईत महामोर्चा काढणार आहोत. गेल्या एक वर्षापासून मुंबईत प्रशासक आहेत. येथे कोणत्याही पक्षाचा किंवा जनतेचा प्रतिनिधी नाहीये. ना नगरसेवक, ना महापौर, ना कुठल्याही समितीचे अध्यक्ष, हे कुणी नसताना तिथे मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरु आहेत. यामुळे 1 जुलै रोजी दुपारी चार वाजता हा मोर्चा काढला जाणार आहे. सर्व मुंबईकर या मोर्चात सहभागी होणार आहेत. मुंबईचे हाल होतायत, असं ज्यांना वटतं ते सर्वजण मोर्चात सहभागी होणार आहेत,” असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Published on: Jun 29, 2023 07:37 AM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा कसा असणार? भाविकांसाठी सोई-सुविधा काय? गहिनीनाथ महाराजांनी सांगितली रुपरेषा…
आधी बैठक, मग पहाटेचा शपथविधी, शरद पवार यांची ‘ती’ खेळी, देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट