“लंडनमध्ये 50 खोके म्हटल्यावर फॉरेनरही म्हणाला एकदम ओके”, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

| Updated on: Jun 18, 2023 | 5:26 PM

आज वरळीत ठाकरे गटाच्या वतीने राज्यभरातील निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

मुंबई : आज वरळीत ठाकरे गटाच्या वतीने राज्यभरातील निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. गद्दारी झाली त्यावेळेस माझ्या वडिलांचं देखील नाव आणि फोटो नेण्याचा प्रयत्न मिंध्यांकडून करण्यात आला. मात्र माझ्या वडिलांनी ते काय आहेत हे दाखवलं. आता लवकरच माझ्या वडिलांचे वडील काय होते आणि आहेत हे दाखवतील. काही लोकांनी जाहिरातीचा इतका धसका घेतला आहे की, उद्याचा वर्धापन दिन आजच उरकून टाकला आहे. घटनाबाह्य उपमुख्यमंत्र्यांनी मिंध्यांना आजच शुभेच्छा देऊन टाकल्या आहेत. कदाचित त्यांना दिल्लीवरून आदेश आला असावा म्हणून त्यांनी ट्विट केलं. 20 तारखेला जागतिक खोके दिन आहे. लंडनमध्ये 50 खोके म्हटल्यावर फॉरेनरही म्हणाला एकदम ओके,” असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

Published on: Jun 18, 2023 05:26 PM
“औरंगजेब..? छे छे छे…शी शी शी…”, प्रकाश आंबेडकरांच्या कृतीवर गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?
‘विश्वगुरु अमेरिकेत …पण मणिपूरमध्ये जायला वेळ नाही’; उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर घणाघात