राज्यात अनेक प्रश्न आहेत, तर राज्यात नवीन गुंतवणूक आलेली दिसत नाही : आदित्य ठाकरे

| Updated on: Jan 06, 2023 | 2:38 PM

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील तरूण बेकारीत आहेत. त्यांना नोकऱ्या नाहीत. महिलांचे प्रश्न त्यांची आवाज ऐकली जात नाही. शेतकऱ्यांना देखिल असच केलं जात आहे. आणि ऐकतात ते फक्त दिल्लीचं आणि हेच दु :ख आहे महाराष्ट्राचं.

मुंबई : राज्यातील बेरोजगारी, महिलांचे प्रश्न आणि विविध समस्यांवरून उद्धव ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं. तसेच त्यांनी यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका देखिल केली.

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील तरूण बेकारीत आहेत. त्यांना नोकऱ्या नाहीत. महिलांचे प्रश्न त्यांची आवाज ऐकली जात नाही. शेतकऱ्यांना देखिल असच केलं जात आहे. आणि ऐकतात ते फक्त दिल्लीचं आणि हेच दु :ख आहे महाराष्ट्राचं.

तसेच राज्यातील विविध प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात विविध ठिकाणी फिरताना नवीन गुंतवणूक आलेली दिसत नाही. तर औरंगजेबवरून देख्ल टीका करताना, राज्यात योगीजी येऊन गेले, मी योगीजी बोलतोय औरंगजेबजी नाही. कारण असं त्यांचे नेते बोलतात, असाही टोला त्यांनी फडणवीस आणि भाजपला लगावला.

Published on: Jan 06, 2023 02:38 PM
शिक्षक, पदविधर मतदाससंघ निवडणूकीत बच्चू कडूंची उडी, शिंदे -फडणवीसांविरोधात लढणार निवडणूक
राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतंय, महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही : अमोल मिटकरी