Aditya Thackeray : लाठीकाठी घेऊन शासन आपल्या दारी का, आदित्य ठाकरे यांचा सवाल
हे सरकार जनरल डायरचे की आमच्या लोकांचा असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय असा लाठीमार होऊ शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंबई, ३ सप्टेंबर २०२३ : महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांकडे जास्त लक्ष देण्यात काही अर्थ नाही. लाठीकाठी घेऊन शासन आपल्या दारी येऊन करायचं काय, असा सवाल आहे. लाठीकाठी घेऊन शासन नेमकं काम कुणासाठी करते. सरकार बिल्डरसाठी काम करताना दिसत आहे. पण, जनतेसाठी कुठंही काम करताना दिसत नाही. असं उबाठाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. पण, या सरकारकडून सगळ्या अपेक्षा सोडल्या आहेत. आधी ओला दुष्काळ पडला होता. आता सुका दुष्काळ पडत आहे. पण, लोकांना या सरकारकडून अपेक्षा राहिली नाही. कारण हे खोक्यांचं सरकार आहे. हे सरकार जनरल डायरचे की आमच्या लोकांचा असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय असा लाठीमार होऊ शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. भाजपची सरकार ही महाराष्ट्र द्रोही सरकार आहे. युवक, महिलांवर लाठीमार करण्यात आला. तत्पूर्वी सरकारच्या वतीनं चर्चा करायला हवी होती. पण, कोणीही आंदोलकांशी चर्चा केली नाही, असा आरोपही त्यांनी केला.