संविधानाचा अपमान, घटनाबाह्य संरक्षण आणि हे आम्हाला… आदित्य ठाकरे यांची राज्यपालांवर टीका
राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात आम्ही महामोर्चा काढला. त्यावेळी अशी आशा होती की राज्यपाल यांना हटवण्यात येईल. पण, त्यांना राजभवनात असे बसवले आहे की तिथे काही तरी लपवून ठेवले आहे.
औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. घटनाबाह्य सरकारला शपथ देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान केला. राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात आम्ही महामोर्चा काढला. त्यावेळी अशी आशा होती की राज्यपाल यांना हटवण्यात येईल. पण, त्यांना राजभवनात असे बसवले आहे की तिथे काही तरी लपवून ठेवले आहे. राज्यपाल यांचे काय लपवलंय की घटनाबाह्य सरकारचे काय लपलं आहे हे कळत नाही. आता अधिवेशनात ते विधानभवनात येतील आणि आम्हाला शिकवतील की महाराष्ट्र म्हणजे काय ? ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. संविधानाचा अपमान केला. त्यांच्याकडून आम्ही महाराष्ट्र म्हणजे काय हे शिकणार आहोत का? असा सवाल युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत बोलताना केला.