मुख्यमंत्री फक्त स्वतःचा विचार करतात, ते फक्त स्वत:साठी दिल्लीला जातात आदित्य ठाकरे यांचा शिंदेंना टोला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याच्या विकासासाठी बाहेर जात नाहीत. इतर राज्याचे मुख्यमंत्री पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. ते आपआपल्या राज्यांचा विचार करतात. पण, आपले मुख्यमंत्री फक्त स्वतःचा विचार करतात, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
मुंबई : शिवसेनेत दोन गट तयार झाल्यानंतर शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमने सामने येताना दिसतात. हे दोन्ही ही गट एकमेकांवर आरोप -प्रत्यरोप करत असतात. आता आदित्य ठाकरे यांनी देखिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करताना, ते फक्त स्वतःचा विचार करतात असा घणाघात केला आहे. आदित्य ठाकरे हे रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या मतदारसंघात शैक्षणिक कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी बोलत होते
यावेळी त्यांनी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याच्या विकासासाठी बाहेर जात नाहीत. इतर राज्याचे मुख्यमंत्री पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. ते आपआपल्या राज्यांचा विचार करतात. पण, आपले मुख्यमंत्री फक्त स्वतःचा विचार करतात. दिल्लीला जाऊन बसतात, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केलाय.
Published on: Jan 05, 2023 04:40 PM