२४ तासात केबिन रिकामी करा, नाहीतर…; आदित्य ठाकरे यांचा लोढा यांच्या केबिनवरून थेट इशारा
त्याचबरोबर त्यांनी महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध केलाय. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्र्यांसाठी महानगरपालिकेत कार्यालय कशाला?, असा सवाल केला आहे. त्याचबरोबर ही प्रथा चुकीची असून मंत्र्यांचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार हे वेगवेगळे असतात.
मुंबई | 22 जुलै 2023 : मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात बाजार समिती आणि शिक्षण समितीच्या केबिन या पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना देण्यात आल्या आहेत. त्यावरून शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट सरकारवर निशाना साधत इशारा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध केलाय. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्र्यांसाठी महानगरपालिकेत कार्यालय कशाला?, असा सवाल केला आहे. त्याचबरोबर ही प्रथा चुकीची असून मंत्र्यांचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार हे वेगवेगळे असतात. तर ज्यांची निवडणुका घेण्याची हिंमत नाही ते महापालिकेत आता घुसखोरी करत आहेत. तर पालकमंत्र्यांना घोटाळे करायला ऑफिस देण्यात आलं आहे. हा जर २४ तासात थांबला नाही. तर मुंबईकर आपला राग व्यक्त करतील मग कुणाला जबाबदार धरणार? ते आपल्याला माहित नाही असाही इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.