Aditya Thackeray : ‘मविआ’च्या कामांना स्थगिती देणारं हे सरकार वैध कसं? आदित्य ठाकरेंचा सवाल

| Updated on: Aug 02, 2022 | 12:52 PM

'महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती देणारं हे सरकार वैध कसं?', असा सवाल माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यावर असताना उपस्थित केलाय. आदित्य ठाकरे हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत.

सोलापूर : ‘महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती देणारं हे सरकार वैध आहे काय?’, असा सवाल माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) सोलापूर (Solapur) दौऱ्यावर असताना उपस्थित केलाय. ‘स्वतःच्या काही गोष्टी आहेत जसे आता नवी मुंबईमध्ये आम्ही तिरुपती बालाजीचं मंदिर आणलेलं अयोध्येसाठी आम्ही मागणी केलेली यूपी (UP) सरकारकडे की तिथे महाराष्ट्र भवन व्हावं महाराष्ट्रात 10 मंदिर जी प्राचीन आहे त्याला आपण फंड दिलेलं पुन्हा दुसरी धाव घेत होतो आणि एक ठिकाणी मंदिर विकास असेल किंवा धार्मिक स्थळ असतील तर हे असं स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणत असेल तर ह्याची नक्की काय परिस्थिती आहे? काय स्थगिती दिली आहे की पुढे नेतात काम हा पण विचार करणे गरजेचे आहे,; असं आदित्य ठाकरे म्हणालेत. आदित्य ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. तिथे ते माध्यमांशी बोलत होते.

 

Published on: Aug 02, 2022 12:52 PM
Anil Desai : नवी चर्चा निर्माण व्हावी म्हणून संजय राऊतांवर कारवाई, खासदार अनिल देसाईंचा आरोप
Aditya Thackeray : ‘गद्दार गद्दारच असतो हे सरकार कोसळणार, लिहून घ्या, माजी मंत्री आदित्य ठाकरेंची टीका