गुवाहटीच्या वाटेवर सूरतहूनच पळून आलेले हेच ते आमदार, आदित्य ठाकरेंनी मारलेली मिठी आज चर्चेचा विषय! Video

| Updated on: Nov 07, 2022 | 1:43 PM

मंचावर नितीन देशमुख यांच्या मुलाला आदित्य ठाकरेंनी प्रश्न विचारला. तुझे बाबा विकले गेले असते आणि 50 खोके मिळाले असते... आजचा दिवस चांगला की खोके चांगले?

दिनेश दुखंडे, अकोलाः पश्चिम विदर्भात एकच निष्ठावान आमदार आहे. त्याला आज मी मिठी मारण्यासाठी आलो आहे, असं वक्तव्य करत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना मंचावरच मिठी मारली. हे तेच आमदार आहेत, जे गुवाहटीला जाण्यासाठी शिंदे (CM Eknath Shinde) गटाबरोबर गेले. मात्र सूरतहूनच निघून आले. शिंदे गटाने गुवाहटीला जाण्यासाठी दबाव आणला, मात्र मी तिथून पळून आल्याचं नितीन देशमुख सांगतात. अकोल्यात आज आदित्य ठाकरे यांनी गद्दार विकले गेले, पण नितीन देशमुख विकले गेले नाहीत, असा आवर्जून उल्लेख केला. सभेत बोलताना नितीन देशमुख आणि अरविंद सावंत यांच्या हातात हात घेत, तो उंचावून दाखवत अभिवादन केलं.  राज्यातील राजकीय वर्तुळात आज आदित्य ठाकरे यांची ही सभा चर्चेचा विषय ठरली आहे.  तसेच मंचावर नितीन देशमुख यांच्या मुलाला आदित्य ठाकरेंनी प्रश्न विचारला. तुझे बाबा विकले गेले असते आणि 50 खोके मिळाले असते… आजचा दिवस चांगला की खोके चांगले? यावर नितीन देशमुख यांच्या मुलाने आजचा दिवस चांगला असं उत्तर दिलं. एकूणच गद्दारांविरोधात वातावरणनिर्मिती करण्याची शिवसेनेची मोहीम तेजीत असल्याचं दिसून येतंय.

Published on: Nov 07, 2022 01:43 PM
एकिकडे ‘हा’ बडा नेता काँग्रेसमधून भाजपात जाण्याची चर्चा, तर दुसरीकडे भारत जोडो यात्रेसाठी नेत्याचे परिश्रम!
EWS आरक्षणाचं स्वागत, पण मराठा समाजाला टार्गेट करणाऱ्या अटी का? ‘या’ नेत्याचा सवाल