Aditya Thackeray : साईबाबांचे आशीर्वाद नेहमीच आमच्यासोबत; शिर्डीत साईबाबांच्या दर्शनानंतर आदित्य ठाकरेंचं प्रतिपादन

| Updated on: Jul 23, 2022 | 7:42 PM

आदित्य ठाकरे मोठ्या गराड्यात संवाद यात्रा संपवून साईमंदिरात (Sai Temple) दाखल झाले. साईसमाधीचे दर्शन घेत आदित्य ठाकरे यांनी साईबाबांची पाद्यपूजा केली.

शिर्डी, अहमदनगर : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) तीन दिवस शिवसंवाद यात्रेवर होते. आज सकाळी त्यांनी औरंगाबाद त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा आणि शिर्डी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शिंदे गटात सामिल झालेल्या आमदारांना त्यांनी अनेकदा गद्दार म्हणून संबोधले. रिमझिम पावसात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी जमा होत ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिल्या. आदित्य ठाकरे मोठ्या गराड्यात संवाद यात्रा संपवून साईमंदिरात (Sai Temple) दाखल झाले. साईसमाधीचे दर्शन घेत आदित्य ठाकरे यांनी साईबाबांची पाद्यपूजा केली. त्यानंतर त्यांनी साई समाधीवर भगव्या रंगाची शॉल साई अर्पण केली. साईबाबांचे आशीर्वाद नेहमीच आमच्यासोबत असल्याच सांगताना राजकीय भाष्य करण्याच मात्र टाळले. दरम्यान, कालच्या औरंगाबादच्या सभेत त्यांनी शिवसेनेतून बंड केलेल्यांना गद्दार म्हणत त्यांचा समाचार घेतला. या सभेला शिवसैनिकांसह (Shivsainik) नागरिक मोठ्या संख्येने पाहायला मिळाले.

Published on: Jul 23, 2022 07:42 PM
Amol Mitkari : देवेंद्र फडणवीस खुनशी प्रवृत्तीचे, ते कधीच मास लिडर होऊ शकत नाहीत; अमोल मिटकरींचा टोला
खऱ्या कार्यकर्त्याला त्यागाची भूमिका स्वीकारावी लागते, मंत्रिमंडळाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य