आदित्य ठाकरे अजूनही बालिश, राजकारण शिकायचे आहे तर… भाजपच्या या नेत्याचा सल्ला काय?

| Updated on: Feb 08, 2023 | 10:11 AM

आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात हा वाद सुरु असतानाच भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी आदित्य ठाकरे यांना सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी आदित्य यांच्यावर टीकाही केली आहे.

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आव्हान दिले होते. त्याच वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार करण्यात आला. आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात हा वाद सुरु असतानाच भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी आदित्य ठाकरे यांना सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी आदित्य यांच्यावर टीकाही केली आहे. आदित्य यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान दिले. पण, आदित्य ठाकरे अजूनही बालिश आहेत. त्यांना खूप राजकारण शिकायचे आहे. अशी बेजबाबदार वक्तव्य करणे त्यांना शोभत नाही. अशी आव्हाने देण्याचे त्यांनी टाळावे हा माझा सल्ला आहे, असे ते म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी काळ वरळीत सभा घेतली त्यावर त्यांनी ते राज्याचे नेते आहेत त्यांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट केले.

विद्यार्थी झाले व्यापारी! पाहा चिमुकल्यांचा ‘किलबिल बाजार’
कोल्हापूर मार्केट यार्डातील हमालांना बाजार समितीत बंदी, काय आहे कारण?