‘सिंपथीवर कोण खेळतंय? लटकेंचा छळ, हेच दुर्दैवी’ भाजपच्या ‘त्या’ दाव्याला प्रत्युत्तर!
भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. ऋतुजा लटके यांच्या बाबतीत सहानुभूतीचं कार्ड यावेळी चालणार नाही, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात येतोय.
गिरीश गायकवाड, मुंबईः अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri East By Poll Election) मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत सहानुभूती चालणार नाही, असं वारंवार भाजपच्या वतीने दावा करण्यात येतोय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही असं वक्तव्य केलंय. यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, सिंपथीवर कोण खेळतंय? ऋतुजा लटकेंचा ज्या पद्धतीने त्यांनी छळ केला, हेच खूप दुर्दैवी आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ठाकरे गटाच्या वतीने लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. ऋतुजा लटके यांच्या बाबतीत सहानुभूतीचं कार्ड यावेळी चालणार नाही, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात येतोय.
Published on: Oct 14, 2022 03:07 PM