“भाजपला कोकणवासियांना देशद्रोही म्हणायचंय का?”, आदित्य ठाकरे यांचा आशिष शेलार यांच्यावर पलटवार
नाणार येथील रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी नाणारला विरोध करून एकप्रकारे पाकिस्तानलाच मदत केली आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांच्या टीकेवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 30 जुलै, 2023 | नाणार येथील रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आले आहेत. नाणार प्रकल्प पाकिस्तानला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी सातत्याने विरोध केल्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचं कोट्यवधीचं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी नाणारला विरोध करून एकप्रकारे पाकिस्तानलाच मदत केली आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांच्या टीकेवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “नाणारचा विरोध कोकणवासीयांनी केला आणि म्हणून आम्ही तिथल्या जनतेसोबत उभे आहोत. त्यामुळे भाजपला कोकणवासियांना देशद्रोही म्हणायचं आहे का?”
Published on: Jul 30, 2023 01:06 PM