‘गद्दारांच्या बॅचमधील चेहरे बघून मजा येत होती’; आदित्य ठाकरे यांची शिंदे गटावर बोचरी टीका

| Updated on: Jul 17, 2023 | 2:38 PM

१० एक दिवसानंतर खातेवाटप देखील पार पडले. यानंतर आता शिंदे गटावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बोचरी टीका केली आहे.

मुंबई, 17 जुलै 2023 | काही दिवसांपुर्वीच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यानंतर १० एक दिवसानंतर खातेवाटप देखील पार पडले. यानंतर आता शिंदे गटावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बोचरी टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी, शिंदे गटाला लक्ष्य करताना, मागून आलेल्या गटाला मंत्रीमंडळ विस्तार स्थान मिळालं, मंत्रीपद मिळालं. मात्र ओरिजनल गद्दारांना मंत्रिपदं मिळालं नाही. त्यामुळे या अधिवेशनात त्यांचे चेहरे पाहताना मजा येत होती, गंमत वाटतं होती अशी टीका केली आहे. तर शिंदे गटाच्या नेत्यांचे चेहरे पाहता, त्यांना मंत्रिपदं मिळणार नाहीत, असंच दिसतंय असाही टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे. मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर प्रतिक्रिया देताना, “आज सगळ्यात जास्त गंमत याची वाटत होती की, एक वर्षापूर्वीची जी ओरिजनल गद्दारांची बॅच होती, त्यांना मंत्रीपद मिळेलं नाही असं आदित्य ठाकरे म्हणालेत. तर शिंदे गटातील गद्दारांचे चेहरे पाहून त्यांच्या मनात काय आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं असही आदित्य ठाकरे म्हणाले.

Published on: Jul 17, 2023 02:38 PM
विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार का नव्हते? ठाकरे गटाचा नेता स्पष्टच बोलला…
“नीलम गोऱ्हे उपसभापती पदावर कायम राहिल्या तर लोकशाहीचा अपमान”, ठाकरे गटाची टीका