आदित्य ठाकरे यांनी सांगितलं मुख्यमंत्री कुठे बोलतात आणि कुठे नाही याचे कारण
मुंबईच्या साडे सहा हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले. टेंडर काढले गेले. पण यात जनतेचा विशासघात केला गेला असा आरोप माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मुंबई : मुंबईच्या साडे सहा हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले. टेंडर काढले गेले. पण यात जनतेचा विशासघात केला गेला असा आरोप माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. टेंडरची जी पाकिटे काढण्यात आली त्यातील पाचपैकी दोन पाकिटे अजून उघडली नाहीत. जी तीन पाकिटे उघडली ती कोणाची होती ? या आधी पत्रकार परिषद घेऊन मुंबईच्या जनतेचे मी साडे चारशे कोटी वाचवले. आताही मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामुळे सुमारे साडे सहाशे कोटी वाचणार आहेत. मुंबईकरांच्या पैसे सरकारच्या ठेकेदार मित्रांना देता काम नये, असे ते म्हणाले. राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्यात आले नाही. तर जे १३ राज्यपाल बदलले त्यात त्यांचे नाव घेतले गेले. महाराष्ट्राच्या अस्मिता पुरुषांचा आपणां होत असताना, स्वाभिमान मोडला जात असताना मुख्यमंत्री काही बोलत नव्हते. जिथे जिथे स्वाभिमान मोडला जातो, तिथे तिथे मुख्यमंत्री कुठेही बोलत नाहीत, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.