Aditya Thackeray : साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर

Aditya Thackeray : साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर

| Updated on: Mar 30, 2025 | 11:22 AM

Waroli Koliwada News : वरळी कोळीवाड्यातून शिर्डीकडे रवाना होणाऱ्या साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आज आदित्य ठाकरे देखील सहभागी झाले. यावेळी त्यांनी सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

वरळी कोळीवाड्यातून शिर्डीला जाणाऱ्या साई बाबांच्या पालखीत आज शिवसेना उबाठा गटाचे आमदार नेते आदित्य ठाकरे यांनी सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी उपस्थितांना गुढीपाडवा आणि हिंदू नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मराठी माणसासाठी आम्ही जसं काम करत आहे, तसं इतरांनी देखील करावं. सगळ्यांना येणारं नव वर्ष सुख समृध्दीचं जावो याच शुभेच्छा, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी ढोल वाजवण्याचा देखील आनंद लुटला.

Published on: Mar 30, 2025 11:21 AM
Nagpur News : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
Haribhau Bagade : हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल