मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य ठाकरे बरसले

| Updated on: Sep 26, 2024 | 3:32 PM

मुंबई आणि पुणे या शहरांकडे लक्ष देण्यासाठी कोणीही नाहीये, तेथे वॉर्ड ऑफिसर नेमलेले नाहीत. मुंबई काल पावसाने अक्षरश: ठप्प झाली. अनेक ठिकाणी ट्रॅफीक कोंडी झाली, रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले, सरकारचा एक प्रतिनिधी रस्त्यावर दिसला नाही, एवढं भयानक चित्र मुंबईने कधीच पाहिलं नाही असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

काल एका कॉनक्लेव्हमध्ये घटनाबाह्य मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) म्हणाले की मुंबई में इस साल कही पानी भरा क्या ? आणि तासाभरातच पावसाने मुंबई भरली अशी टीका शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली. मुंबईतल काल इतकी भयानक स्थिती असताना शासनाचा एकही प्रतिनिधी लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर नव्हता. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जो साल 26 जुलै 2005 पावसात भरला तो काल भरला. हिंदमाता येथे आमच्या सरकारने काम केले होते. तेथे पाणी भरायलाच नको होते तेथे त्यांनी काय लक्ष दिले नाही की तेथेही पाणी तुबल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. गेली दहा वर्षे या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूका होऊ दिलेल्या नाहीत. त्यामुळे जनतेने कोणाकडे न्याय मागायचा. प्रशासकीय अधिकारी काय कारभार करीत आहे काल मुंबईकरांनी पाहीले आहे. एका परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की दोन वर्षांत मुंबई खड्डे मुक्त करू, त्यांची ही जुनीच टेप आहे. गेल्यावर्षी आणि या वर्षीचा रस्त्यातील कामांचा घोटाळा मीच उघड केला होता. पण अजूनही रस्ते खोदून ठेवले आहेत,अर्धा किलोमीटर देखील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम झालेलं नाही. कॉन्ट्रॅक्टर, पैसे आणि खोके एवढीच या सरकारची , राजवटीची पहिल्यापासून प्रायॉरिटी होती, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. 15 वॉर्ड ऑफीसर नेमायला, तुम्हाला एवढी वर्ष का लागतात,असा सवालही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

Published on: Sep 26, 2024 03:31 PM
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
हेही नको आणि तेही नको, एक नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्तीत स्वतंत्र भारत पक्ष सहभागी