Aditya Thackeray : आजपासून आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला सुरुवात

| Updated on: Jul 21, 2022 | 9:36 AM

आजपासून युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) शिवसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. आजपासून 23 जुलैपर्यंत शिवसंवाद यात्रेचा पहिला टप्पा पार पडणार आहे.

आजपासून युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. आजपासून  23 जुलैपर्यंत शिवसंवाद यात्रेचा पहिला टप्पा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज दुपारी बारा वाजता भिवंडीत शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज या मेळाव्याच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे. सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Published on: Jul 21, 2022 09:36 AM
Ukai Dam : उकाई धरणातून पाण्याचा विसर्ग
Shiv Sena : गोंदियाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू यांची हकालपट्टी