Aditya Thackeray: नांदेडमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळं बांधकाम विभागाला आली जाग; शहरातील खड्डे बुझवण्याचे काम सुरु
खड्डे बुझवण्यासाठी मोठे-मोठे दगड टाकल्याने स्थानिक प्रवाश्याना छोट्या-मोठ्या अपघाताला सामोर जावे लागेल अशी चिंता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. याबरोबरच बांधकाम विभागाला मंत्र्यांच्या दौऱ्यामुळं रस्त्यातील खड्डे बुझवण्यास मुर्हत मिळाला अशी टीकाही लोकांकडून केली जात आहे.
नांदेड – नांदेडमध्ये मंत्री आदित्य ठाकरेंच्या(Aditya Thackeray) दौऱ्यामुळे बांधकाम विभागाला जागा आली आहे. दौऱ्या असल्याच्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाने शहरातील खड्डे बुझवण्याची मोहीम हाती घेतली आहे. जया ठिकाणी दौऱ्याचा मार्ग आहे त्या ठिकाणावरील खड्डे (Pits)तात्पुरत्या स्वरूपात बुझवले जात आहेत. मात्र खड्डे बुझवण्यासाठी मोठे-मोठे दगड टाकल्याने स्थानिक(Citizen) प्रवाश्याना छोट्या-मोठ्या अपघाताला सामोर जावे लागेल अशी चिंता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. याबरोबरच बांधकाम विभागाला मंत्र्यांच्या दौऱ्यामुळं रस्त्यातील खड्डे बुझवण्यास मुर्हत मिळाला अशी टीकाही लोकांकडून केली जात आहे.