शंभूराज देसाईंकडून राऊतांना खुलं चॅलेंज, म्हणाले… या…
मंत्री शंभूराज देसाईंकडून पाठराखण करण्यात आली. तसेच शरद पवारांबद्दल महाराष्ट्राला आणि देशाला आदर आहे. त्यांनी राज्याच नेतृत्व देशात केलं आहे
मुंबई : आधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना दादा भुसे यांची सभागृहात जीभ घसरली. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले. त्यावेळी मंत्री शंभूराज देसाईंकडून पाठराखण करण्यात आली. तसेच शरद पवारांबद्दल महाराष्ट्राला आणि देशाला आदर आहे. त्यांनी राज्याच नेतृत्व देशात केलं आहे. मात्र संजय राऊत हे ज्या पद्धतीने आमच्यावरती टीका टिप्पणी करत आहेत, त्याचा निषेध करतो. आमच्या मतांवर निवडून आलेले संजय राऊत आम्हाला गटारातल पाणी, डुक्कर, प्रेत म्हणातात. महागद्दार आमच्या मतावर निवडून आला आहे. त्याला आमच्याबद्दल वक्तव्य करण्याचा अधिकार नाही. आमच्या ४० मतांवर निवडून आलेल्यांनी राजीनामा देवून निवडून यावं” असे देसाई यांनी म्हटले आहे.
Published on: Mar 21, 2023 02:38 PM