307 चे गुन्हे कसे काय मागे घेता येणार?, ॲड.गुणरत्न सदावर्ते यांचा सवाल
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे. मी देखील उपोषण केले होते. परंतू आपले डॉक्टर सरकारी होते. जरांगे यांचे डॉक्टर खाजगी आहेत. त्यांनी खरेच उपोषण केले असेल तर त्यांनी काळजी घ्यावी आणि गावी सुखरुप जावे. सोमवारी याबाबत सर्व गोष्टी स्पष्ट होतील तोपर्यंत वाट पाहा असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.
मुंबई | 27 जानेवारी 2024 : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांग पाटील यांच्या लढ्याला यश आले आहे. मराठ्यांना कुणबीप्रमाणपत्रावर ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी अडचणीचे ठरत असलेल्या सगे सोयरे संबंधीचे परिपत्रक सरकारने रात्री उशीरा काढले आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण आणि आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे. आता या निर्णयावर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे. मराठ्यांच्या EWS आरक्षणाचे या आंदोलनामुळे नुकसान झाल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे.
सगे सोयरे याचा अर्थ काय? रक्ताचे नाते म्हणजेच सगेसोयरे यात नविन काही नाही. किती जणांना 37 लाख प्रमाणपत्रे मिळाली ? हे नोटीफिकेशनही कोर्टात टीकणार नाही. याची कोणती मागणी मान्य झाली आहे. 307 सारखे गुन्हे मागे घेता येऊ शकतात ? एसटी सारखी सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीवर सुप्रीम कोर्टाचे काय आदेश आहेत असा सवाल सदावर्ते यांनी केला आहे. सदावर्ते यांनी खरंच उपोषण केले असेल तर त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी आणि सर्वांना आपआपल्या घरी शांततेत जावू द्यावे आणि सोमवारी कोर्टात सर्वबाबी स्पष्ट होतील तोपर्यंत वाट पाहावी असेही ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.