ठाकरे आणि पवार यांना अटक करावी लागेल, काय म्हणाले एड.गुणरत्न सदावर्ते
दलापूर अत्याचार प्रकरणातील पोलिसांची भूमिका आणि सत्ताधाऱ्यांची बोटचेपी भूमिका तसेच आंदोलकांवरील लाठीमार आणि गुन्हे दाखल केल्याने महाविकास आघाडीने उद्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. या विरोधात एड.गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसाकडे तक्रार केली आहे.
मविआचा उद्याचा महाराष्ट्राचा गलिच्छ राजकारणासाठीचा बंद आहे. बदलापूरातील चिमुकल्या ताईंबद्दल आम्हालाही दु:ख आहे. परंतू या ताईंना दूध आणि अन्नाचा घास काय शरद पवार आणून देणार आहे का ? त्यामुळे आम्ही या बंद विरोधात खेरवाडी पोलिसांकडे तक्रार केलेली असल्याचे एड.गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या ट्वीटचा वापर आम्ही आमच्या फिर्यादीत केलेला आहे. उद्यापर्यंत त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागेल. कोणताही बंद हा बेकायदेशीर असतो हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. त्यांना बदलापूरातील पिडितांशी काही घेणे नाही. कष्टकऱ्यांच्या तोंडात शरद पवार घास घालणार का ? कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. बाळासाहेब ठाकरेंना ते कोर्टाने दंड ठोठावला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना अटक करावी लागेल असेही एड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
Published on: Aug 23, 2024 12:07 PM