राजीनामा दिला, मतदारसंघात आले, लोकसभा की विधानसभा लढविणार का? निलेश राणे काय म्हणाले?

| Updated on: Nov 02, 2023 | 11:11 PM

मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी असे आवाहन माजी खासदार निलेश राणे यांनी केलंय. निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला.

रत्नागिरी | 2 नोव्हेंबर 2023 : माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरी येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली. चांगल्या आणि वाईट काळात हे कार्यकर्ते कायम पाठीशी राहिले. त्यांच्या भेटीसाठी मी आलो आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या पंधरा वर्षात रत्नागिरीशी संपर्क तोडलेला नाही. रत्नागिरीवर माझं नेहमीच लक्ष राहणार. मंत्री उदय सामंत आणि आमची भेट झाली. त्याचे काहीही अर्थ काढू शकता पण अशा गाठीभेटी होत असतात. ही कुठली राजकीय भेट नव्हती. सामंत आणि आमच्या भेटीमधल्या तुम्ही चर्चा काय त्या रंगवा. तुम्हाला वाटत असेल ते आमचे वैरी आहेत पण राजकारणात तसं नसतं. सध्या पक्षाची भूमिका वेगळी आहे आणि आता आम्ही महायुतीमध्ये आहोत. पण, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्याशी आमच्या भेटी मात्र राजकीय नसतात असा टोला त्यांनी लगावला. लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत पक्षश्रेष्ठ निर्णय घेतील. त्याबाबत मी काही बोलणार नाही असेही ते म्हणाले.

Published on: Nov 02, 2023 11:11 PM