Gunaratna Sadavarte Get Relief : 18 दिवसांच्या कोठडीनंतर सदावर्तेंची सुटका, बाहेर येऊन काय म्हणाले!

| Updated on: Apr 26, 2022 | 8:08 PM

हा विजय हिंदुस्थानी नागरिकांचा, एसटी महामंडळातील कष्टकरांच्या आहे

मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात एसटीचं आंदोलन (ST Movement) पेटलं होतं. या आंदोलनाला शेवटी हिंसक वळण लागलं आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर आक्रमक आंदोलन झालं. या आंदोलनाप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांची बाजु मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते गेल्या अनेक दिवसांपासून अटके होते. ते गुणरत्न सदावर्तें तब्बल 18 दिवसांनंतर कारागृहाबाहेर आले आहेत. बाहेर येताच हम है हिंदुस्थानीच्या घोषणा गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांनी दिल्या. हम है हिंदुस्थानी… या भारताच्या संविधानापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. ही आहे झेन सदावर्ते माझी 13 वर्षाची मुलगी आणि ही आहे माझी पत्नी जयश्री पाटील आणि या मित्र परिवाराने या अन्यायाविरोधात मला साथ दिली. अशी प्रतिक्रिया दिली. जेलमध्ये असताना सदावर्ते यांनी सरकारविरोधात उपोषण सुरू केल्याचीही माहिती समोर आली होती. गेल्याने अनेक दिवसांपासून त्यांना या कोठडीतून त्या कोठडीत जावं लागत होतं. मात्र आज त्यांना जामीन मिळाल्याने सदावर्ते बाहेर आले आहेत.

Published on: Apr 26, 2022 08:02 PM
Pune मध्ये पारगे नगरमधील एका गोडाऊनला आग
Gunratna Sadavarte | ‘एसटी कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी मी सांगितलं’