भाजपच्या तुषार भोसलेंकडून अजित पवार यांचा व्हिडीओ टि्वट; म्हणाले ते तर वाचाळवीर
अजित पवार यांच्याकडून सावित्रीबाई होळकर असा उल्लेख झाल्यानंतर भाजपच्या आचार्य तुषार भोसले यांनी व्हिडीओ ट्विट करत माफी मागण्याची मागणी केली. तुषार भोसले यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई : पुणे येथील कार्यक्रमात भाषणावेळी बोलण्याच्या ओघात अजित पवार यांच्याकडून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ म्हणण्याऐवजी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ असा उल्लेख झाला. त्यानंतर आथा पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका होत आहे. तर कार्यक्रम संपताच आपल्याकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊं माँसाहेब’ या महामानवांचं स्मरण करताना, कर्तृत्व सांगताना बोलण्याच्या ओघात हे झालं. त्याबाबत आपण दिलगीरी व्यक्त करत असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं होतं
अजित पवार यांच्याकडून सावित्रीबाई होळकर असा उल्लेख झाल्यानंतर भाजपच्या आचार्य तुषार भोसले यांनी व्हिडीओ ट्विट करत माफी मागण्याची मागणी केली. तुषार भोसले यांनी अजित पवार यांच्यावर टीका देखील केली आहे.
आर्चार्य भोसले यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करताना, वाचाळवीर अजित पवार यांनी आधी संभाजी महाराजांच्या मुद्यावरून हिंदूंच्या भावना दुखावल्या आणि आता क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा अपमान केला. आतातरी माफी मागणार की मग्रूरपणे ठाम राहणार असा सवाल उपस्थित केलाय.