ठाकरे यांच्यावर टीका करताना वापरलेल्या ‘त्या’ शब्दावरून नितेश राणेंच्या विरोधात तृतीयपंथी आक्रमक; गुन्हा दाखल करण्याची मागणी
पुण्यात तृतीयपंथींनी आंदोलन केलं आहे. नितेश राणेंच्या विरोधात तृतीयपंथी आक्रमक झाले असून त्यांच्यात आणि पोलिसांत झटापट झालेली आहे.
पुणे : माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या जोरदार वाकयुद्ध रंगलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची कलंक असा उल्लेख केल्यानंतर भाजपसह फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी देखील जोरदार टीका केली. तसेच त्यांनी ठाकरे यांच्याबाबत इन्स्टाग्राम, सोशल मीडिया, फेसबुकवर पोस्ट टाकत ठाकरे यांच्या एका फोटोवर हिजड्यांचे सरदार असा उल्लेख केला. त्यावरून आता पुण्यात तृतीयपंथींनी आंदोलन केलं आहे. नितेश राणेंच्या विरोधात तृतीयपंथी आक्रमक झाले असून त्यांच्यात आणि पोलिसांत झटापट झालेली आहे. यावेळी तृतीयपंथी यांनी बंडगार्डन चौकात आंदोलन केलं
Published on: Jul 12, 2023 12:22 PM