देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची राज्यावरील पक्कड ढीली झालीय, विजय वडेट्टीवार यांची टीका

| Updated on: Dec 31, 2023 | 7:49 PM

गुजरात येथे महाराष्ट्रातील प्रकल्प एका मागोमाग चालले आहेत. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या दृष्टीने ही 'चुल्लुभर पाणी में डुब मरो' अशी परिस्थिती आल्याची टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांचा ठाणे जिल्हाच काय तर संपूर्ण राज्य अंमलीपदार्थ्यांच्या आहारी गेले आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची राज्यावरील पक्कड ढीली झाली आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

नागपूर | 31 डिसेंबर 2023 : संपूर्ण राज्य ड्रग्जच्या विळख्यात चालले आहे. महाराष्ट्रात केवळ प्रत्येकाचे लक्ष्य आपल्या माणसांना सांभाळणे आणि तिजोरी लूटणे याच कडे आहे. रेव्ह पार्टी कुठेही चालत आहेत. गुटखा आणि तंबाकूजन्य पदार्थांवर बंदी असून सर्रास त्याची विक्री सुरु आहे. आणि मंत्र्यांच्या घरापर्यंत पैसे पोहचवले जात आहे. गृहखात्याचा काही अंकुश राहीलेला नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची पक्कड ढीली होत चालली असल्याची टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्य मात्र अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा अंमलीपदार्थांच्या आहारी गेले आहे. महाराष्ट्र एकेकाळी अग्रस्तानी होता. आता महाराष्ट्र एक क्रमांकावर आठव्या क्रमांकावर गेला आहे. समृद्ध गुजरात करून देश खिळखिळा करणे चालू आहे. महाराष्ट्राच्या तरुणांना रस्त्यावर भिक मागण्याची परिस्थिती राज्यकर्त्यांनी आणली असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Published on: Dec 31, 2023 07:49 PM
मराठा समाजाचा डाटा गोळा करायला एक वर्षे लागेल, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले स्पष्ट
मुंबईतील मराठा समाज बांधवांची या तारखेला बैठक, मनोज जरांगे पाटील यांनी दिली माहिती