‘सावित्रीबाई फुले यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर फडणवीस भडकले, इशारा देताच माफिनामा आला समोर
महापुरुषांबाबत लिखाण करणारे राज्यात मोकाट फिरतात असे म्हणताना राहुल गांधी यांच्यावरून बाळासाहेब थोरात यांनी सवाल उपस्थित केला होता. त्यावेळी थोरात यांनी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत ज्यांनी विकृत लिखान करणाऱ्याच्या मुसक्या आवळून धिंड काढून रस्त्यावरून फिरवले पाहिजे असे म्हटलं होतं.
मुंबई, 31 जुलै 2023 | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाणावरून पावसाळी अधिवेशात जोरदार चर्चा झाली होती. तर काँग्रेसच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला धारेवर धरले होते. तर लिखान करणारऱ्या वेबसाईटवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तर महापुरुषांबाबत लिखाण करणारे राज्यात मोकाट फिरतात असे म्हणताना राहुल गांधी यांच्यावरून बाळासाहेब थोरात यांनी सवाल उपस्थित केला होता. त्यावेळी थोरात यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत ज्यांनी विकृत लिखान करणाऱ्याच्या मुसक्या आवळून धिंड काढून रस्त्यावरून फिरवले पाहिजे असे म्हटलं होतं. त्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, धिंडच नव्हे तर भर चौकात त्याला फाशी दिली पाहिजे असे म्हटलं होतं. तर ज्याने हे लिखान केलं आहे त्याचा शोध घेऊन कठोर कारवाई करणार असा इशारा दिला होता. त्यानंतर आता ‘भारद्वाज स्पीक’ या नावाच्या ट्विटर हँडलवरून बिनशर्त माफिनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा माफिनामा फडणवीस यांनी इशारा दिल्यानंतर देण्यात आला आहे.