विदर्भातील नेत्याचा मोठा दावा! देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार? पटोले यांच्यावर टीका; म्हणाला, ‘चुल्लूभर पाण्यात’
अमरावतीत झालेल्या जनसभेतही त्यांनी आपण फक्त विदर्भाच्या विकासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नाहीतर लोक म्हणतात आशिष देशमुख इकडे जातो तिकडे जातो. पण हा प्रवेश आता अविरत आणि अहयातीसाठी केला आहे.
अमरावती : काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेससह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडणं सुरू ठेवलं आहे. आता अमरावतीत झालेल्या जनसभेतही त्यांनी आपण फक्त विदर्भाच्या विकासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नाहीतर लोक म्हणतात आशिष देशमुख इकडे जातो तिकडे जातो. पण हा प्रवेश आता अविरत आणि अहयातीसाठी केला आहे. तर यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करताना, ज्या माणसाला त्यांनी काढून टाकलं आज तोच जिल्ह्याचा अध्यक्ष बनला आहे. त्यामुळे त्यांनी आता चुल्लूभर पाण्यात डुबल पाहीजे. तर जो जाणार नाही अशालाही ते लाथ मारून पक्षाच्या बाहेर काढत आहेत. त्यामुळे भविष्यात काँग्रेसची अवस्था ही बिकट होईल. तर पटोले यांची अवस्था ही लेचे पेचे नेत्यासारखं होणार आहे. त्याचबरोबर आता येत्या निवडणुकित येथे तिकिट कोणाला मिळणार हात की घड्याळ यावरूनच मारामारी होणार आहे. त्यामुळे येत्या काहीच दिवसात आता भाजपमध्ये दुसरेही देशमुख प्रवेश करतील असा दावा त्यांनी केला आहे.